Thursday 4 October 2018

माधव आपटे

माधव आपटे हे भारताचे सुरुवातीच्या काळातील क्रिकेटपटू होते. त्यांचा जन्म ५ आँक्टोबर १९३२ रोजी मुंबईत झाला. त्यांनी भारताकडून सात कसोटी सामने खेळले होते. त्यांचे पदवी शिक्षण मुंबई विद्यापीठामध्ये झाले. फाईन आर्टचे त्यांचे शिक्षण घेतले होते. ते १९८९ मध्ये त्यांची भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. त्यांचे बंधू अरविंद आपटे हेसुद्धा प्रथर्मशेणी क्रिकेटपटू होते. माधव आपटे लेगस्पिनर होते. एलफिन्सटन महाविद्यालयात असताना त्यांनी विनू मंकड यांच्या मार्ग्दर्शनात क्रिकेटचे धडे गिरविले. १९५२ मध्ये त्यांनी प्रथमच रणजी स्पर्धेत सौराष्ट्रकडून पदार्पण केले. विजय र्मचंट यांना दुखापतीमुळे संघाबाहेर ठेवल्याने ही संधी त्यांना मिळाली होती. नंतर १९५३ मध्ये वेस्ट इंडिजच्या दौर्‍यासाठी त्यांची निवड झाली. पोर्ट आँफ स्पेन येथे झालेल्या सामन्यात त्यांनी चांगल्या धावा काढून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

No comments:

Post a Comment