Monday 15 October 2018

संदीप कौर

भारताच्या ग्रामीण भागामध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. आशियाई चषकात पदकं मिळवलेले अनेक खेळाडू छोट्या भागातून आले आहेत. पण या खेळाडूंना बर्‍याच आव्हानांचा सामना करावा लागतो. ही आव्हानं सामाजिक, आर्थिक आणि शारीरिक असतात. १६ वर्षांच्या संदीप कौरने स्वत:ला सिद्ध केलं आहे. अनेक आव्हानांना सामोरं जात ती बॉक्सर बनली आहे. 
अनेक यशस्वी अँथलिटची कहाणी संघर्षाने भरलेली असते. त्याला सामाजक, आर्थिक, शारीरिक आणि मानसिक आव्हानांना सामोरं जात पुढे यावं लागतं. या आव्हानांचा सामना केल्याने त्यांना यश मिळतंच असं नाही. पण आयुष्यात नव्या संधी निर्माण होतात. १६ वर्षांच्या संदीप कौरबद्दलही असंच म्हणता येईल. पंजाबमधल्या पटियाला जिल्ह्य़ातील हसनपूर गावातली संदीप कौर बॉक्सर आहे. संदीप कौरला सामाजिक आणि आर्थिक अशा दोन्ही स्तरांवर संघर्ष करावा लागला. तचे वडील सरदार जस्वीर सिंग रिक्षाचालक आहेत. आपल्या तुटपुंज्या कमाईत ते घराचा खर्च कसाबसा चालवायचे. आपलं कुटुंब उपाशी झोपणार नाही याची काळजी घ्यायचे. 
पंजाबमधील काही भागात पुरूषप्रधान संस्कृती नांदते. महिलांनी घरची कामं करायची, बॉक्सिंगसारखा खेळ त्यांच्यासाठी नाही असाच समज इथे प्रचलित आहे. संदीपच्या वडिलांनाही या मानसकतेला सामोरं जावं लागलं. मुलीला बॉक्सिंगला पाठवायला तिथल्या लोकांचा विरोध होता. पण या विरोधाला न जुमानता त्यांनी संदीपला पूर्ण पाठिंबा दिला. त्याची गोड फळं आता संदीप चाखते आहे. तने पोलंडमध्ये झालेल्या सिलेसयन बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत ५२ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं. याआधी वरिष्ठ महलांच्या ४८ किलो वजनी गटात मेरी कोमने पदक पटकावलं. 
संदीपला काकांकडून बॉक्सिंगचं बाळकडू मिळालं. तिचे काका समरनजीत सिंग जवळच्या गावातल्या अकादमीत बॉक्सिंगचा सराव करायला जात असत. लहानपणी संदीपही काकांसोबत या अकादमीत जात असे. तथे तिने बर्‍याच तरूणांना बॉक्सिंग करताना पाहिलं आण या खेळातला रस वाढू लागला. तिने वयाच्या आठव्या वर्षापासून बाॅिक्संग ग्लोव्हज घालून सरावाला सुरुवात केली. संदीपला गावकर्‍यांच्या विरोधाला सामोरं जावं लागलं. पण तिने कोणाचाही विरोध जुमानला नाही. आज संदीप कौरचं गावात खूपच कौतुक होत आहे. ती गावातल्या असंख्य मुलींसाठी प्रेरणास्थान बनली आहे. संदीपला बॉक्सिंगला पाठवू नये यासाठी कुटुंबावरही बराच दबाव होता. पण त्यांनीही या दबावाला भीक घातली नाही. त्यामुळे आज संदीपला हे यश मिळालं आहे. गावागावातल्या मुलींना अशाच प्रोत्साहनाची गरज आहे.

No comments:

Post a Comment