Thursday 11 October 2018

नव्या व्यावसायिक वाटांचा शोध

आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण काही ना काहीतरी आपल्याला शिकवतच असतो. जो क्षण आपल्याला शिकवतो, तेच खरं शिक्षण. पण असं जरी असलं, तरीही शालेय शिक्षण पूर्णझाल्यावर आपल्या प्रत्येकाला नोकरी-व्यवसाय करण्यासाठी पुढील शिक्षण घ्यावेच लागते. सर्वसाधारणपणे दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या व्यक्तीला पुढील शिक्षणाची दिशा ठरवावी लागते. सद्यस्थितीत विविध शिक्षणाच्या अनेक वाटा खुल्या झाल्या आहेत. अगदी त्या अगणित आहेत, असं म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही आणि त्यामुळेच संभ्रमावस्था निर्माण होते.
आपल्यासाठी अथवा आपल्या पाल्यासाठी नेमकी कोणती दिशा ठरवावी, कोणते शिक्षण निवडावे, कोणते करिअर भावी आयुष्यात अर्थ आणि स्थैर्य प्राप्ती करून देईल, असे अनेक प्रश्न आपल्याला अधिकच गोंधळात टाकतात. प्रत्येक अभ्यासक्रमासाठी पात्रतेचे निकषनिरनिराळे असून, त्या संबंधीची माहिती त्या त्या विद्यापीठाच्या तसेच शैक्षणिक संस्थांच्या नियमांनुसार ठरविण्यात आलेली असते. काही अभ्यासक्रमांसाठी सामायिक अथवा केंद्रीय प्रवेश प्रक्रिया व संबंधित परीक्षा देणं क्रमप्राप्त ठरतं.
विविध नव्या व्यावसायिक वाटा : पारंपरिक अभ्यासक्रम, तंत्रशिक्षण क्षेत्रातील अभ्यासक्रम, उच्च शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक्रम, वैद्यकीय क्षेत्रातले अभ्यासक्रम, व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम, शेतकी क्षेत्रातील अभ्यासक्रम, विविध परकीय भाषांचे अभ्यासक्रम, वृत्तपत्रविद्या व पत्रकारितेच्या क्षेत्रातील अभ्यासक्रम, सिने-नाट्य अभिनय व नृत्यप्रकारातील अभ्यासक्रम, नाट्य, जाहिरात व वास्तुविद्या, योगा विषयीचे अभ्यासक्रम, औषधविषयक, पायदळ-हवाईदल-नौसेना विषयक अभ्यासक्रम, बँंक व फायनान्स क्षेत्रातील अभ्यासक्रम, आदी.
वरील अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतरही अनेक व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम विविध विद्यापीठ स्तरांवर तसेच खासगी शैक्षणिक संस्थांमध्ये उपलब्ध असून, पुढे दिलेल्या काही संकेतस्थळांवर सविस्तर माहिती मिळविता येईल. सद्य:स्थितीत विश्‍वविद्यालय अनुदान आयेाग म्हणजेच युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन (यूजीसी) यांनी मान्यता दिलेली महाराष्ट्रातील पुढील विद्यापीठे विविध ठिकाणी निरनिराराळे लहान-मोठे प्रमाणपत्र, पदविका, पदवी तसेच त्यापुढील उच्च शिक्षण देत आहेत. अशा काही यूजीसी मान्यताप्राप्त विद्यापीठांची नावे तसेच त्यांची संकेतस्थळे याविषयी माहिती पुढीलप्रमाणे :
१) विश्‍वविद्यालय अनुदान आयोग म्हणजेच युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन (यूजीसी) : www.ugc.ac.in
२) कोकण कृषी विद्यापीठ, दापोली : www.dbskkv.org
३) महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ अँड सायन्स, नाशिक : www.muhsnashik.com
४) महाराष्ट्र अँनिमल अँड फिशेरी सायन्स युनिव्हर्सिटी, नागपूर : www.mafsu.in
५) मुंबई युनिव्हर्सिटी, मुंबई : www.mu.ac.in
६) पुणे युनिव्हर्सिटी, पुणे : www.unipune.ac.in
७) शिवाजी युनिव्हर्सिटी, कोल्हापूर : www.unishivaji.ac.in
८) श्रीमती नाथिबाई दामोदर ठाकर्सी वुमेन युनिव्हर्सिटी, मुंबई : www.sndt.ac.in
९) यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी, नाशिक : www.ycmou.digitaluniversity.ac
सकारात्मक दृष्टिकोन ठेवून निवडलेले आपले करिअर निश्‍चितच सुख, समृद्धी, धन, धान्य, भूमी, गृह, ऐश्‍वर्य, वाहन सर्वकाही आपल्याला सहज देऊ करणारं ठरूशकेल.

No comments:

Post a Comment