Tuesday 9 October 2018

कादंबरीकार आर. के. नारायण

प्रसिद्ध कादंबरीकार आर. के. नारायण यांचा जन्म १0 आँक्टोबर १९0६ रोजी झाला. त्यांचे पुर्ण नाव रासीपुरम अय्यर नारायणसामी होते. भारतीय लेखकांच्या तीन सर्वात महान साहित्यिकांमध्ये त्यांची गणना होते. कादंबरी आणि कथा प्रकाराच्या माध्यमातून त्यांनी विविध स्तर आणि रुपातील मानवीय विकास आणि अध:पतनाचे चित्रण केले. गाईड कादंबरीसाठी १९६0 मध्ये त्यांना साहित्य अकादमी हा सर्वोच्च सन्मान मिळाला. १९३५ साली नारायण यांनी मालगुडी नावाच्या एका काल्पनिक गावाला केंद्रस्थानी कल्पून स्वामी अँन्ड फ्रेन्ड्स या नावाची आपली पहिली कथामालिका लिहिली. त्यावेळी त्यांचे लिखाण भारतात कोणाच्याही पसंतीस उतरले नाही. या गोष्टी वाचून लेखक ग्रॅहॅम ग्रीन यांना मात्र या कथांमध्ये त्यांचे नवीन मित्र भेटल्यासारखे वाटले. त्यांनी पुढाकार घेऊन नारायण यांची ही कथामालिका छापण्यात रस घेतला आणि हे पुस्तक अतिशय गाजले. त्यानंतर नारायण यांनी एका पाठोपाठ एक सरस गोष्टी लिहून काढल्या. त्या वाचताना वाचक त्यात हरवून जातात. हे गाव पूर्णपणे काल्पनिक आहे. यावर अनेकांचा विश्‍वास बसत नाही, इतके वास्तववादी चित्रण नारायण यांनी कथांमधून उभे केले आहे. साधी लिखाणशैली आणि हलक्या-फुलक्या विनोदामुळे नारायण यांची तुलना प्रसिद्ध रशियन लेखक आंतोन चेखव यांच्याशी केली जाते. त्यांचे लिखाण जगातल्या अनेक भाषांमध्ये भाषांतरित झाले आहे.

No comments:

Post a Comment