Saturday 13 October 2018

व्याकरणकार तर्खडकर

अव्वल इंग्रजीतील मराठी व्याकरणकार, ग्रंथकार आणि कळकळीचे धर्मसुधारक दादोबा पांडुरंग तर्खडकर (९ मे १८१४-१७ ऑक्टोबर १८८२) यांचा जन्म मुंबईत झाला. प्राथमिक शिक्षण घरी वडिलांजवळ तसेच खासगी शाळांतून आणि माध्यमिक शिक्षण 'बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी'च्या शाळेत झाले. गुजराती व फारसी भाषा त्यांना अवगत होत्या. सरकारी नोकरीत शिक्षक, अधीक्षक, उपजिल्हाधिकारी अशा विविध हुद्यांवर त्यांनी काम केले, सेवानवृत्तिनंतर अल्पकाळ ओरिएंटल ट्रान्स्लेटरच्या हुद्यावर ते होते. संस्कृत व इंग्रजी भाषांच्या व्याकरणाचे अध्ययन करून आणि मराठी भाषेच्या रूपविचाराची स्वतंत्र प्र™ोने व्यवस्था लावून मराठी भाषेचे व्याकरण (१८३६) त्यांनी सिद्ध केले. हय़ा व्याकरणाच्या अनेक आवृत्या निघाल्या. १८८१ मध्ये दादोबांनी आपल्या व्याकरणाच्या सातव्या आवृत्तीची पूरणिकाही प्रसिद्ध केली. विद्यार्थ्यांसाठी शालोपयोगी लघुव्याकरणही (१८६५) त्यांनी लिहिले. त्याच्याही अनेक आवृत्या निघाल्या. मोरोपंतांच्या केकावलीवर यशोदापांडुरंगी (१८६५) ही गद्य टीका त्यांनी लिहिली. त्यातून दादोबांची सहृदयता प्रत्ययास येते. हय़ा टीकेस इंग्रजी आणि मराठी अशा दोन प्रस्तावना त्यांनी जोडल्या. त्यापैकी मराठी प्रस्तावनेत त्यांचे वाड्मयविषयक विविध विचार आलेले आहेत. त्यांचे १८४६ पर्यंतचे आत्मचरित्र महत्त्वाचे आहे. याशिवाय मराठी नकाशांचे पुस्तक (१८३६), इंग्रजी व्याकरणाची पूर्वपीठिका (१८६0), धर्मविवेचन (१८६८), पारमहंसिक ब्राह्मधर्म (१८८0) आणि शिशुबोध (१८८४) अशी त्यांची ग्रंथरचना आहे, तसेच काही मराठी आणि इंग्रजी स्फुट निबंधही त्यांनी लिहिले. विधवापुनर्विवाहाचे सर्मथन करण्यासाठी त्यांनी लिहिलेला 'विधवार्शुमार्जन' हा संस्कृत निबंध बाबा पदमनजी हय़ांच्या यमुनापर्यटन या कादंबरीत अंतभरूत करण्यात आला होता. मुंबई येथे त्यांचे निधन झाले. सुप्रसिद्ध अमेरिकन संशोधक थॉमस अल्वा एडिसन (११ फेब्रुवारी १८४७ - १८ ऑक्टोबर १९३१) म्हणजे अनेक नव्या विद्युत, प्रकाश व ध्वनी उपकरणांचे जनक. त्यांचा जन्म मिलान, ओहायओ येथे झाला. त्यांचे शिक्षण मिशिगनमधील पोर्ट ह्यूरन येथील शाळेत केवळ तीन महिनेच झाले होते. वयाच्या बाराव्या वर्षापासून रेल्वेत संदेशवाहकाचे व त्यानंतर पंधराव्या वर्षापासून निरनिराळ्या शहरांत तारायंत्रावर काम करून त्यांनी आपला चरितार्थ चालविला. फावल्या वेळात ते अभ्यासात व प्रयोगकार्यात निमग्न असत. मत नोंदविणार्‍या त्यांच्या विद्युत यंत्राकरिता १८६८ मध्ये त्यांना पहिले पेटंट मिळाले. त्यानंतरच्या काही वर्षांत त्यांनी एकाच तारेवर दोन वा अनेक संदेश एकाच वेळी वाहू शकणार्‍या व स्वंयचलित तारायांत्रिक पद्धतीचा तसेच टंकलिखाणाच्या आवृत्त्या काढण्याकरिता विद्युत लेखणीचा (याचाच पुढे 'मिमिओग्राफ' या स्वरूपात विकास झाला) शोध लावला. कार्बन प्रेषकाचा (ध्वनितरंगांचे विद्युत प्रवाहात रूपांतर करणार्‍या साधनाचा) शोध लावून (१८७७-७८) ग्रॅहॅम बेल यांचा दूरध्वनी व्यवहारोपयोगी करण्यास त्यांनी मदत केली. एडिसन यांचा सर्वपरिचित व सर्वांत मूळचा शोध फोनोग्राफचा होय (१८७७). त्यांचा मूळचा नमुना हाताने फिरवावयाच्या टीनच्या पत्र्याच्या वृत्तचितीचा (नळकांड्याच्या आकाराचा) होता. दहा वर्षानंतर त्यांनी मोटरने चालणारा व मेणाची वृत्तचितीकार तबकडी उपयोगात आणणारा फोनोग्राफ तयार केला. त्यानंतर त्यांनी, सांगितलेला मजकूर लिहून घेण्यास मदत करणारे 'एडिफोन' या कचेर्‍यांच्या कामकाजास उपयुक्त असलेल्या उपकरणाचा शोध लावला. व्यवहारोपयोगी विजेचा उद्दीप्त (तापलेल्या तंतूपासून प्रकाश देणारा) दिवा तयार करण्यासाठी त्यांनी केलेले अनेक प्रयोग निष्फळ ठरले व त्यांकरिता त्यांना ४0,000 डॉलरपेक्षाही जास्त खर्च सोसावा लागला. परंतु, अखेरीस २१ ऑक्टोबर १८७९ रोजी काचेच्या निर्वात फुग्यात ठेवलेल्या कार्बनयुक्त कापसाच्या धाग्याचा उद्दीप्त दिवा तयार करण्यात त्यांना यश आले. नंतरच्या दहा वर्षांत त्यांनी विजेद्वारे प्रकाश, उष्णता व शक्ती यांच्या निर्मितीसाठी व वितरणासाठी तीन तारांच्या पद्धतीचा शोध लावला. विद्युत जनित्र (डायनामो) व मोटर यांत सुधारणा केल्या आणि विद्युत रेल्वेच्या विकासास मदत केली. १८९१-१९00 या काळात त्यांनी प्रामुख्याने लोह खनिजांची सांद्रता (दिलेल्या घनफळात असणारे खनिजाचे प्रमाण) चुंबकीय पद्धतीने वाढविण्यासंबंधी संशोधन केले. त्यानंतर त्यांनी शिशाच्या संचायक विद्युत् घटापेक्षा (विद्युत भार साठवून ठेवणार्‍या घटापेक्षा) बराच हलका असा एक नवीन प्रकारचा निकेल हायड्रेट , आयर्न ऑक्साईड व पोटॅशियम हायड्रॉक्साईड उपयोगात आणणारा संचायक विद्युत घट तयार केला. १८९१ मध्ये त्यांनी प्राथमिक स्वरूपाच्या चलचित्रपट कॅमेर्‍याचे (किनेटोस्कोपिक कॅमेरा) व नंतर चलचित्रपट पडद्यावर दाखविणार्‍या प्रक्षेपकाच्या पेटंटसाठी अर्ज केला. उद्दीप्त दिव्याच्या गोलकामध्ये एक धन विद्युत भारित धातूची पट्टी बसविल्यास दिव्यातील तप्त तंतूपासूनधातूच्या पत्र्याकडे विद्युत प्रवाह वाहतो असा त्यांनी १८८३ मध्ये शोध लावला. ते ऑरेंज येथे मृत्यू पावले.

No comments:

Post a Comment