Saturday 6 October 2018

वाघ पर्यावरण समतोल राखणारा प्राणी

 जंगलात वाघ असणे हे समृध्द जंगलाचे प्रतीक आहे. जंगलात असलेल्या अन्नसाखळीमधील वाघ हा मुख्य घटक आहे. तसेच वाघामुळे जंगलात असलेल्या वनस्पतींचे आणि इतर तृणभक्षी प्राण्यांमध्ये समतोल राखला जातो. त्यामुळे वाघ हा पर्यावरणातील असमतोल राखण्यासाठी जैविक साखळीतील महत्त्वाचा घटक आहे. वाघांची संख्या ज्या जंगलात जास्त असते ते जंगल किंवा तेथील भाग हा सर्व दृष्टीने परिपूर्ण असल्याचे मानले जाते. जंगल उत्कृष्ट असेल तर मानवी जीवन सुसह्य होण्यास कारणीभूत ठरते.
वनसंपदेमुळे सर्व प्राणीमात्रांसाठी आवश्यक असलेला ऑक्सिजन, मुबलक पाणी, आणि जमिनीची धूप थांबण्यासही मदत होते. पर्यायाने जंगलांसाठी सर्व वन्यजीव वाचविणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. त्यात वाघ हा या जैविक साखळीतील महत्त्वाचा घटक आहे.    
     व्याघ्र प्रकल्पासाठी घोषित केलेले क्षेत्र हे निमसदाहरित जंगल असून ते दुर्गम व अति उतार असलेले, डोंगराळ तसेच घनदाट असल्याने या भागात गवे, सांबर, रानडुक्कर, लंगूर यांचा वावर जास्त प्रमाणात आहे. तथापि, त्यांची संख्या ही इतर अभयारण्य किंवा इतर व्याघ्र प्रकल्पांच्या तुलनेत कमी असल्याने त्यांच्या संख्येत वाढ होण्याच्या दृष्टीने वनविभागामार्फत प्रयत्न केले जाणार आहेत. यामुळे या भागातील वाघांचे अस्तित्व कायम टिकविण्यासाठी मदत होणार आहे. व्याघ्र प्रकल्पाच्या माध्यमातून वाघांसाठी पोषक वातावरण तयार करून, त्यांचे प्रजनन वाढवून त्यांच्या संख्येत वाढ करणे हा प्रमुख उद्देश असणार आहे.
     वाघांच्या संवर्धनाकरिता केंद्र शासनाने सन १९७२ पासून विशेषतत्वाने राबविण्यात येत असलेल्या केंद्र शासन पुरस्कृत योजनेअंतर्गत असलेली सर्व राष्ट्रीय उद्याने व अभयारण्य यांचा व्याघ्र प्रकल्पामध्ये समावेश आहे. भारतीय अधिनियम १९२७ अन्वये वनक्षेत्रांचे व वन्यजीवांचे संरक्षण करता येते. वन्य (संरक्षण) संरक्षण करता येते. अधिनियम १९७२ अंतर्गत वन्यजीव व वन्यप्राण्यांना राष्ट्रीय उद्याने व अभयारण्याची निर्मिती करुन विशेष संरक्षण देता येते. वन (संवर्धन) अधिनियम १९८0 या कायद्यात वनक्षेत्रांचे कामासाठी उपयोगाबाबत तरतुदी आहे. जैवविविधता जनन अधिनियम २00२ यासह क्रिमिनल प्रोसिजर कोड आदी कायदे सुध्दा अस्तित्वात आहेत.
      राज्यात एकूण २३ अभयारण्ये आहेत. यामध्ये मेळघाटामील नरनाळा, वाण अभयारण्य, मेळघाट अभयारण्य अमरावती, अंबाबरवा अभयारण्य बुलडाणा, करनाळा पक्षी अभ्यारण्य, तानसा वन्यजीव अभयारण्य, तानसा वन्यजीव अभयारण्य, नायगाव मयुर वन्यजीव अभयारण्य, रेहकुळी काळविट अभयारण्य, राधानगरी वन्यजीव अभयारण्य, मयुरेश्‍वर वन्यजीव अभयारण्य, चपराळा वन्यजीव अभयारण्य यांचा समावेश आहे. गुगामल हे राष्ट्रीय उद्यान हे अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात आहे. पेंच राष्ट्रीय उद्यान पेंच नागपूर, ताडोबा व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर, गोंदिया आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली, मुंबई यांचा समावेश आहे.

No comments:

Post a Comment