Monday 15 October 2018

मानसिक आजार

बदलती जीवनशैली, वाढती जीवघेणी स्पर्धा आणि त्यात टिकून राहण्याचे आव्हान सर्वांसमोर आहे. मुले, तरुण ते ज्येष्ठांपयर्ंत सर्वच वयोगटांतील लोक ताणतणावाला बळी पडत आहेत. दिवसेंदिवस मनोरुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मानसिक आजारी रुग्णांत नोकरदार वर्ग व महिला आघाडीवर आहेत. सवर्ंच क्षेत्रांतील नोकरदार मानसिक रोगांना बळी पडत आहेत. कमी पगार हेच केवळ आत्महत्यांचे कारण नाही, तर अतिताण हेही कारण आहे. डॉक्टरांनासुद्धा तणावाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अलीकडे डॉक्टरही आत्महत्या करायला लागले आहेत. सेल्स, मार्केटिंग, वितरण तसेच कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणार्‍या नोकरदारांना ठराविक उद्दिष्ट वेळेत गाठण्याचे दडपण असते. आरोग्याच्या तक्रारी, वरिष्ठांचे असहकार्य अशा अनेक बाबींना सामोरे जावे लागते.
मानसिक आजाराला सामोरे जावे लागणार्‍यांत नोकरदार महिलांची संख्या वाढत असून, घर आणि नोकरी यात समन्वय साधताना त्यांना तणाव व नैराश्याला तोंड द्यावे लागते. नोकरीतील अनिश्‍चितता, अपुरा पगार, टार्गेट्स पूर्ण झाली नाही तर कारवाईची चिंता, जीवनशैलीतील बदल अशी प्रमुख कारणे आहेत. या कारणांमुळे नोकरदारांचे मानसिक स्वास्थ्य धोक्यात आले आहे. त्यातही उच्च शिक्षण घेऊनही मनासारखी नोकरी मिळत नसल्याने आत्महत्यांचा मार्ग अनुसरणारे अनेक तरुण आहेत. देशात उच्चशिक्षित तरुण, तरुणींमध्ये बेरोजगारीचं प्रमाण सर्वात जास्त आहे. तलाठी, कारकून किंवा पोलिस कॉन्स्टेबल पदासाठी इंजिनिअरिंगच्या पदवीधारकांचे अर्ज येतात. दहावी-बारावीची पात्रता आवश्यक असलेल्या जागांसाठी द्विपदवीधर, पीएच.डी धारकांचे अर्ज येतात. गेल्या दोन-तीन दशकांत देशाची आर्थिक प्रगती झाली; पण त्या तुलनेत नोकर्‍यांचे प्रमाण मात्र कमी झाले आहे. गेल्या काही वर्षांत सगळ्याच राज्यांत बेरोजगारी वाढली आहे. आतापयर्ंत दरवर्षी पगारात जेमतेम तीन टक्के वाढ होत आली आहे; पण या कामगारांचे दरमहा वेतन १0 हजार किंवा त्याहून कमी असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण हे त्यांच्यापुढील एक आव्हान आहे. त्यातूनही आत्महत्यांचे प्रमाण वाढते आहे. गेल्या तीन दशकांमध्ये र्शमिक उत्पादकता सहा पटीने वाढली; पण पगारात केवळ दीड टक्केच वाढ झाली आहे. सरकारी कर्मचारीच फक्त त्याला अपवाद असतील. महिन्याला ५0 हजार रुपयांहून अधिक पगार घेणारे नोकरदार देशात केवळ एक टक्काच आहेत. एकसमान कामासाठी महिला आणि पुरुषांच्या पगारात बरीच तफावत आहे. एकीकडे सरासरी दहा टक्के वेतनवाढ होईल, अशा बातम्या माध्यमांतून येत असताना दुसरीकडे प्रत्यक्षात इतकी वेतनवाढ होणारा वर्ग हा अतिशय अल्प असतो. वाढती महागाई आणि वेतनात न होणारी वाढ हेही नैराश्यवाढीचे एक कारण आहे. कुटुंबाच्या भल्याची चिंता असणे स्वाभाविक असले तरी त्यातूनही मार्ग काढला पाहिजे. आत्महत्या किंवा मानसिक आजार बळावू देणे योग्य नाही.

No comments:

Post a Comment