Monday 8 October 2018

नॉलेज पार्क 1


प्रश्न-उत्तर 
1)2018 च्या आशियाई स्पर्धा या देशात झाल्या ....
क.भारत ख.इराण ग.चीन घ.इंडोनेशिया
2)2018 च्या आशियाई स्पर्धेत भारताने इतकी सुवर्णपदके  जिंकली....
क.18 ख.15 ग.19 घ.24
3) आशियाई स्पर्धेत भारत या खेळात नेहमी सुवर्ण पदक जिंकत आला आहे,पण या खेपेला सुवर्णपदक जिंकू शकला नाही....
क) धावणे ख.टेनिस ग.कबड्डी घ. हॉकी 
4) आशियाई स्पर्धेत या वर्षी या खेळाचा पहिल्यांदाच समावेश करण्यात आला आणि भारताने पहिल्यांदाच या स्पर्धेत पदकदेखील मिळवले....
क) कुस्ती ख.ब्रिज ग.टेनिस घ. बुद्धिबळ
5) 2018 च्या आशियाई स्पर्धेत सर्वाधिक पदकांची लयलूट या देशाने केली....
क.चीन ख. इंडोनशिया ग.इराण घ. दक्षिण कोरिया 
6) टेनिसच्या या स्पर्धेत भारताने सुवर्ण पदक जिंकले...
क. पुरुष एकेरी ख.महिला एकेरी ग.पुरुष दुहेरी घ.महिला दुहेरी
7) पुढच्या आशियाई स्पर्धा 2022 मध्ये या देशात होणार आहेत....
क.भारत ख.चीन ग. पाकिस्तान घ.दक्षिण कोरिया

उत्तरे:1)2) 3) 4) 5) 6) 7)

विक्टोरिया मेमोरियल
कोलकात्यातील सर्वात प्रसिद्ध इमारत आहे ही विक्टोरिया मेमोरियल. कोलकाता पाहायला आलेला प्रत्येक पर्यटक ही इमारत पाहिल्याशिवाय राहत नाही. 1901 मध्ये क्वीन विक्टोरिया हिच्या मृत्यूनंतर तिच्या स्मरणार्थ कोलकातामध्ये एक भव्य इमारत उभारण्याचा निर्णय घेतला गेला. जॉर्ज पंचम याने 4 जानेवारी 1904 मध्ये ला या इमारतीची कोनशिला उभारली.इमारत बांधायला तब्बल 17 वर्षे लागली. 1921 मध्ये ही इमारत बांधून पूर्ण झाली.कोलकाताच्या 'मैदान' परिसरात उभारलेली ही सुंदर इमारत संगमरवरीपासून बनवली गेली आहे. या इमारतीच्या डावीकडे काही अंतरावरून हुगली नदी वाहते. आता या इमारतीला संग्रहालय बनवण्यात आले आहे.

जास्वंदीचे फूल
नजरेत भरणारा रंग आणि पाच पाकळ्यांनी मनोहारी बनलेल्या जास्वंदीच्या फुलाचे बाह्यस्वरूप आकर्षक असते. मधमाश्‍या, फुलपाखरे आणि काही पक्षी या फुलाकडे आकर्षित होतात. पण हे फूल फार काळ टिकत नाही. सकाळी टवटवीत सौंदर्य उधळणारे हे फूल संध्याकाळी मलूल दिसते."शू-फ्लॉवर' हे नाव असल्याचे कारण जास्वंदीची फुले काळ्या चामडी बुटांवर घासली तर पॉलिश केल्याप्रमाणे बूट चकाकतात.जास्वंदीच्या फुलांना सुगंध नसला, तरीही ती वनस्पती बरीच लोकप्रिय आहे. साहजिकच हे फुलझाड अनेक घरांच्या सभोवताली दिसून येते. जास्वंदीची श्वेत, लालबुंद, पीतरंगी, भगवी, गुलाबी किंवा जांभळी फुले सार्वजनिक उद्यानांत उठून दिसतात. जास्वंदीमध्ये एक हजार सूक्ष्म रंगछटा आहेत.जास्वंदवर्गीय वनस्पतींचे सुमारे सव्वादोनशे प्रकार आहेत. त्यातील काही पाच-सहा मीटर उंच वाढतात. उंच वाढणार्‍यांत "हिबिस्कस कॅनाबिनस' ही जात असून, ती त्याच्या लाकडासाठी प्रसिद्ध आहे. भरपूर सेल्युलोजयुक्त कर्बोदके असलेल्या या वनस्पतीला "केनाफ' म्हणतात आणि कागदनिर्मितीच्या उद्योगात तो एक महत्त्वाचा कच्चा माल आहे.केस वाढीसाठी आणि काळे होण्यासाठी जास्वंदीचे फूल महत्त्वाचे औषधी गुणधर्म असणारे फूल आहे.

अनोखा क्रिकेटर 
इंग्लंडचा क्रिकेटपटू एलिस्टर कूक याने वयाच्या 33 व्या वर्षात क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.क्रिकेट विश्वात कसोटी खेळात सर्वाधिक धावा बनवणाऱ्या खेळाडूंमध्ये कूक हा पाचव्या क्रमांकाचा खेळाडू आहे. इंग्लंडमध्ये इंग्लंडकडून सर्वाधिक सामने खेळणारा, सर्वाधिक धावा काढणारा आणि सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम एलिस्टरच्या नावावर आहे.आपल्या आपल्या पहिल्या आणि शेवटच्या सामन्यात अर्धशतक आणि शतके ठोकण्याचा तो इंग्लंडचा एकमेव खेळाडू आहे.


No comments:

Post a Comment