Wednesday 3 October 2018

स्टार्टअप सुरू करताय?


अनेक तरुण व्यावसायिक किंवा उद्योजक होण्यावर भर देत आहेत. स्टार्ट अप ही संकल्पना आता आपल्या देशातही रूजू लागली आहे. अनेक स्टार्ट अप्सना आर्थिक बळ मिळत आहे. भारतीय स्टार्ट अप्समध्ये होणार्‍या परकीय गुंतवणुकीतही वाढ झाली आहे. त्यामुळे तरुण मंडळी स्टार्ट अप सुरू करण्याचा विचार करू शकतात. पण गुंतवणूकदार कोणत्याही स्टार्ट अपमध्ये गुंतवणूक करत नाहीत. स्टार्ट अपची वैशिष्ट्य जाणून घेतात. त्यातल्या संधींबद्दल जाणून घेतात. मगच पुढचं पाऊल टाकतात. तुम्हीही स्टार्ट अप सुरू करण्याचा विचार करत असाल तर गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी काय करता येईल याविषयी..
1) गुंतवणूकदारांचं व्यवसायातल्या अनिश्‍चिततेकडे लक्ष असतं. स्टार्ट अपच्या व्यवसायात अनिश्‍चितता असल्यास गुंतवणूकदार दोनदा विचार करतात. धोका कमी असेलल्या स्टार्ट अपकडे विशेष लक्ष दिलं जातं.
2) गुंतवणूकदारांसाठी स्टार्ट अपची संकल्पनादेखील महत्त्वाची असते. स्टार्ट अपचा व्यवसाय कसा वाढणार आहे, त्यासाठी स्टार्ट अप कोणत्या संकल्पना लढवणार आहे याकडेही लक्ष दिलं जातं.
3) स्टार्ट अपची टीमही महत्त्वाची असते. स्टार्ट अपमधल्या कर्मचार्‍यांच्या कार्यक्षमतेवर, कल्पकतेवर बरंच काही अवलंबून असतं. आत्मविश्‍वास असलेल्या, अनुभवी, मेहनती टीममध्ये गुंतवणूक केली जाते.
4) स्टार्ट अपचे संस्थापक तसंच संपूर्ण टीमचा व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टीकोनही महत्त्वाचा असतो.

No comments:

Post a Comment