Thursday 11 October 2018

राममनोहर लोहिया

समाजवादी नेते राममनोहर लोहिया यांचा जन्म २३ मार्च १९१0 रोजी उत्तरप्रदेशातील अकबरपूर येथे झाला. अडीच वर्षांचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांचे वडील महात्मा गांधींचे अनुयायी होते. मुंबईच्या मारवाई शाळेत त्यांचे शिक्षण झाले. १९२0 मध्ये त्यांनी लोकमान्य टिळकांच्या निधनाच्या दिवशी विद्यार्थ्यांसोबत पहिल्यांदा आंदोलन केले. गांधींच्या आवाहनानुसार त्यांनी दहा वर्षांचे असताना शाळा सोडून दिली. १९२१ मध्ये शेतकरी आंदोलनादरम्यान त्यांची भेट जवाहरलाल नेहरू यांच्यासोबत झाली. १९२४ मध्ये ते प्रतिनिधी म्हणून काँग्रेसच्या अधिवेशनात सहभागी झालेत. १९२५ मध्ये त्यांनी दहावीची परीक्षा दिली यात त्यांनी ६१ टक्के गुण मिळवले. यानंतर वाराणशीच्या काशी विद्यापीठात शिकायला गेले. पुढे कोलकाता येथे शिक्षण घेतले. अखिल बंग विद्यार्थी संमेलनात नेताजी सुभाषचंद्र बोस न पोहोचल्यामुळे त्यांच्याकडे संमेलनाचे अध्यक्षपद देण्यात आले. १९२८ मध्ये ते काँग्रेसच्या अधिवेशनात सहभागी झाले. नंतर ते विद्यार्थी संघटनेत सक्रीय झाले. सायमन कमिशन विरोधातील आंदोलनात त्यांनी भाग घेतला. पुढे १९३0मध्ये अग्रवाल समाजाच्या मदतीने शिक्षणासाठी इंग्लंडला व बर्लिनला गेले. भगत सिंग यांना फाशी देण्याचा त्यांनी लीग आँफ नेशन्सच्या बैठकीत निषेध केला.१७ मे१९३४ रोजी त्यांनी समाजवादी पार्टीच्या स्थापनेचा निर्णय घेतला. २२ आँक्टोबर १९३४ रोजी मुंबईत काँग्रेस सोशलिस्ट पक्षाची स्थापना केली.

No comments:

Post a Comment