Thursday 4 October 2018

रक्ताविषयी हे माहिती आहे का?


जगभरात रक्त वेळेत न मिळाल्याने अनेकांना जीव गमावावा लागतो. ही समस्या सोडविण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने १९९७ साली स्वेच्छा रक्तदानाचा पाया घातला आणि जगभरातील स्वेच्छा रक्तदात्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून २00४ पासून जागतिक रक्तदान दिवस साजरा होऊ लागला.
जीवनदान देणार्‍या रक्ताविषयी आपल्यला बरीच माहिती असते आणि तरीही अनेक गोष्टी आपल्याला माहिती नसतात. मानवी रक्ताचे चार प्रमुख गट आहेत ते ए, बी, एबी आणि ओ हे आपण जाणतो. मात्र मांजर या प्राण्यात रक्ताचे ११, कुत्र्यात १0 तर गाईमध्ये रक्ताचे ८00 प्रकारचे रक्तगट असतात याची अनेकांना कल्पना नसते.
जगातील पहिली रक्तपेढी १९३७ साली स्थापन झाली. नवजात बाळाच्या शरीरात २५0 मिली रक्त असते तर वृद्ध व्यक्तीच्या शरीरात ५ लिटर रक्त असते. हे प्रमाण शरीराच्या एकूण वजनाच्या ७ टक्के असते. भारतात दर ३ सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते. जगात दररोज ४0 हजार युनिट रक्त लागते.
आपल्या धमन्यातून वाहणारे रक्त सरासरी तशी ४00 किमी वेगाने वाहते म्हणजे एका दिवसात रक्त शरीरात ९५00 किमीचा प्रवास करत असते. रक्तातील लाल पेशी शरीराला प्राणवायूचा पुरवठा करतात तर पांढर्या रक्तपेशी शरीरात शिरलेल्या विषाणूंशी लढतात. रक्ताच्या एका थेंबात १0 हजार पांढर्‍या पेशी असतात आणि २,५0,000 प्लेटलेट असतात.
कोणताही निरोगी माणूस रक्तदान करू शकतो मात्र गरोदर महिला आणि स्तनपान देणार्‍या महिला रक्तदान करू शकत नाहीत.

No comments:

Post a Comment