Saturday 6 October 2018

डॉ.सलील कुलकर्णी

डॉ. सलील कुलकर्णी हे नावाजलेले मराठी-भारतीय गायक, संगीतकार आणि लेखक आहेत. सलील यांनी त्यांची सांगीतिक कारकीर्द वयाच्या तिसर्‍या वर्षी आकाशवाणी वरून केली. त्यांनी संगीताचे शिक्षण पं. गंगाधरबुवा पिंपळखरे, जयमाला शिलेदार आणि प्रमोद मराठे यांच्याकडे घेतले. शिक्षणाने ते डॉक्टर असून संगीताची प्रचंड आवड असल्याने त्यांनी संगीतामध्ये बस्तान बसवले. गेल्या पंधरा ते वीस वर्षांच्या सांगीतिक कारकीर्दीमध्ये त्यांनी अनेक हिंदी आणि मराठी अल्बमना संगीत दिले आहे. तसेच हिंदी आणि मराठी चित्रपटांना संगीत संगीत दिले आहे. २00३ मध्ये संदीप खरे यांच्या बरोबर त्यांनी 'आयुष्यावर बोलू काही' हा सांगीतिक कार्यक्रम सुरु केला त्याला अफाट प्रसिद्धी मिळाली. त्याचे ७00 च्या वर प्रयोग झाली आहेत. झी मराठी ने 'नक्षत्रांचे देणे' या विविध संगीतकार आणि कवी यांच्या गीतांवरील कार्यक्रमाचे संगीत नियोजन त्यांनी केले. नवीन पिढीचे संगीतकार अशी त्यांची ओळख असून त्यातही बालगीतांचे संगीतकार म्हणून त्यांना जास्त पसंती आहे. त्यांचा अग्गोबाई ढग्गोबाई (अल्बम) आणि अग्गोबाई ढग्गोबाई - भाग २ (अल्बम) हे विशेष गाजले आहेत. दूरचित्रवाणीवरील 'सा रे ग म प तसेच 'गौरव महाराष्ट्रा'चामधील परीक्षक म्हणून त्यांना भरपूर प्रसिद्धी मिळाली. क्रिकेट आणि स्वयंपाक घरातील खुसखुशीत उदाहरणे देऊन त्यांनी नवीन गायकांना मार्गदर्शन केले आहे. 'आयुष्यावर बोलू काही' या कार्यक्रमापासून ते 'सारेगमप'मधील परिक्षकापयर्ंतचा सलील यांचा प्रवास पाहता ते आज लहानथोरांचे आवडते झाले आहेत.

No comments:

Post a Comment