Saturday 6 October 2018

यकृत

खाल्लेल्या अन्नावर प्रक्रिया करण्याचं काम यकृत करतं. त्यामुळेच मद्यपानानंतर यकृत अधिक प्रमाणात दारुच्या सानिध्यात येतं. एका र्मयादेपर्यंत यकृत दारुचे घातक परिणाम नाहिसे करण्यासाठी योग्य ती प्रक्रिया करतं आणि स्वत:ला आणि शरीरातील इतर अवयवांना परिणामांपासून वाचवू पाहतं. परंतु, ही र्मयादा ओलांडल्यास यकृतात बिघाड होतो. दारू प्यायल्यामुळे होणार्‍या यकृताच्या नुकसानीचं प्रामुख्याने तीन गटात वर्गीकरण केलं गेलं आहे. पहिला प्रकार म्हणजे चरबीयुक्त यकृत. यकृतात वाढलेल्या चरबीयुक्त पेशींद्वारे हा विकार लक्षात येतो. या विकारात यकृताचा आकार वाढतो आणि पोटाच्या वरच्या भागात अस्वस्थता निर्माण होते. दुसरा प्रकार म्हणजे अल्कोहोलिक हेपटायटीस. यात दारुमुळे यकृताचा दाह अल्कोहोलक हेपटायटीस स्वरुपात अनेक वर्ष राहू शकतो. तिसरा प्रकार म्हणजे अल्कोहोलिक सिरोसिस. सिरोसिसचा संदर्भ यकृताच्या सामान्य ऊतींची जागा जखमी उतींनी घेण्याशी आहे. सिरोसिसने यकृताचं होणारं नुकसान कधीही भरुन येत नाही. मात्र वेळेवर उपचार घेतले तर हा विकार नियंत्रित होऊ शकतो. त्यासाठी दारू पिणं पूर्णपणे बंद करायला हवं.

   

No comments:

Post a Comment