Monday 8 October 2018

सेकंद म्हणजे किती काळ?

काळाच्या मोजमापाविषयी सखोल माहती घेताना बर्‍याच बाबींची दखल घ्यावी लागते. सेकंद हे कालमापनातील सर्वात लहान एकक ठरवताना कोणता विचार केला याची माहिती आपण घेत आहोत. 
अणुकेंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन प्रदक्षिणा घालतात, हे शास्त्रज्ञांना समजलं आणि अणूंमधील आवर्तनांचा विचार होऊ लागला हे जाणून घ्यायला हवं. त्यातूनच काही अणू निरनिराळ्या ऊर्जापातळींमध्ये वर-खाली जात असल्याचं दिसून आलं. एखाद्या मुलानं पायर्‍या चढण्या-उतरण्याचा खेळ खेळावा तसे हे अणू एका ऊर्जा पातळीतून वरच्या पातळीत उडी घेतात आणि परत खालच्या पातळीत येतात. ही आवर्तनं अवरत सुरू असतात. त्यावर हवेचा दाब, थंडी-वारा आदी कशाचाही परिणाम होत नाही. त्यामुळे त्यांचाच आधार सेकंदाचं प्रमाणीकरण करण्यासाठी घेण्यात आला. सिझियम या मूलद्रव्याचे अणू एका सेकंदात ९ अब्ज आवर्तनं पुरी करतात आणि त्यात काहीही बदल होत नाही, हे दिसून आल्यानंतर सेकंदाची व्याख्या त्या संदर्भातच करण्यात आली. सीझियमच्या अणूची ९,१९२,६३१,७७0 आवर्तनं पूर्ण होण्यासाठी लागणारा काळ म्हणजे एक सेकंद, हे आता जगभर मान्य झालं आहे

No comments:

Post a Comment